राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यातर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त "लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन" संकल्पनेतून गोर -गरिबांना अन्नदान.


पनवेल / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळामध्ये व लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे एकवेळच्या जेवणाचे देखील हाल झाले आहेत. या जाणिवेतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २ जून रोजी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या माध्यमातून व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी राबविलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब भोजन या संकल्पनेतून पनवेल तालुक्यातील पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, कामोठे, डेरवली याठिकाणी परिसरातील गोर - गरीब व गरजू नागरिकांना एकदिवासिय भोजन सेवा राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात एकही माणूस उपाशीपोटी झोपला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या संस्थेतर्फे हा भोजन सेवा पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे असे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी यावेळी सांगितले.