इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल जुलै 2020 मध्ये केलेल्या कामाची संक्षिप्त माहिती. 



पनवेल आणि आसपासच्या समाजाच्या हितासाठी मागील 30 वर्षांपासून इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल, सामाजिक प्रकल्पांचे आयोजन करीत आहे.


क्लबचा 31वा स्थापना सोहळा 18 जुलै २०२० रोजी ऑनलाइन पार पडला. या नवीन संघात, क्लब अध्यक्ष नम्रता सचदेव, उपाध्यक्ष मोना जेठवा, आयपीपी अनुराधा शुक्ला, सेक्रेटरी स्मृती बिस्वास, कोषाध्यक्ष शिल्पा राजपूत, आयएसओ रुबी सिंघल, संपादक सुनीता डोर्लीकर, जे.टी. सेक्रेटरी रीमा रावल, आणि जे.टी. कोषाध्यक्ष रश्मी वरिया, आणि सल्लागार सदस्यांसह सुनीता कांदपीले, डॉ. हेमलता परमार आणि श्यामाराणी मिश्रा क्लबचे नेतृत्व करतील. 40 पेक्षा जास्त सदस्यांसह नवीन संघाने समाजसेवा सुरू ठेवण्याचे वचन दिले आहे.



27 जुलै रोजी, आरोग्य व स्वच्छता किट (सॅनिटायझर बाटली, टॉवेल, २ साबण, फेस मास्क, टूथ पेस्ट, २ टूथ ब्रशेस आणि हेअर ऑईल), लहान रेशन पॅकेटसह आर्सेनिक अल्बम मेडिसिन, शबरी हॉटेलच्या मागे गणेश नगरातील 30 कुटुंबांना वाटण्यात आले.



पर्यावरण संरक्षणासाठी 28 आणि 31 जुलै रोजी, नवीन पनवेलमधील शिव मंदिराच्या मोकळ्या जागेत आणि जुना पनवेलमधील विश्रली नाका, सिंधी पंचायत मैदानात फळझाडे लावण्यात आली.



कोव्हीड वॉरियर्सच्या सन्मानार्थ आणि सुरक्षा म्हणून, ऑगस्टमध्ये, क्लब लवकरच पीएमसी परिसरातील काही पोलिस ठाण्यांमध्ये सेनिटायझर स्टँडचे वितरण करेल.