काँग्रेस मुखपत्र साप्ताहिक प्रशिकचे अनावरण काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांच्या हस्ते


काँग्रेस मुखपत्र साप्ताहिक प्रशिकचे अनावरण काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांच्या हस्ते


पनवेल दि.16 (वार्ताहर)-  पनवेल काँग्रेस भवन मध्ये काँग्रेसचे मुखपत्र साप्ताहिक प्रशिकचे अनावरण पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांच्या शुभहस्ते पार झाला. या साप्ताहिकाचे संपादक मोहन गायकवाड यांच्या संकल्पनेतून या साप्ताहिक प्रशिकचा उदय झाला आहे. काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत व सामाजिक कार्य, समाजातील बातम्या ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हेच या मागचे उद्देश आहेत. या वेळी पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव कटेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, अखिल अधिकारी, जयवंत देशमुख, सुधीर मोरे, किसन नेरुळकर, सरिता पाटणकर, आरती ठाकूर, अमित लोखंडे, आर आर पाटील, अमित लोखंडे, गणेश कांबळे, प्रमोद पवार, संदीप सातारकर, हेमंत खैरे उपस्थित होते.
साप्ताहिक प्रशिकचे संपादकीय मंडळा मध्ये संपादक मोहन गायकवाड, उपसंपादक हेमराज म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, लतीफ शेख, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंग,डॉ. धनंजय क्षीरसागर, संतोष चिखलकर, प्रवीण कांबळे, नौफिल सय्यद,  अभिजित पाटील, विश्वजीत पाटील आहेत.


Popular posts
महाराष्ट्र नवनिर्माणसेना तर्फे गुरुद्वाराचे माझी अध्यक्ष व संस्थापक सदस्य श्री. हरचंद सिंह सग्गु यांना सन्मानित
Image
जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचा राष्ट्रवादी मध्ये येण्याचा ओघ सुरूच
Image
राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे आदिवासी व गरीबवस्तीतील बालगोपाळांसोबत स्नेहभोजन करून दहीहंडी साजरी 
Image
पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती बाळ आणि बाळंतीण सुखरूप,10 महिन्यातील दुसरी घटना
Image