लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट, संगीता जोशी सामाजिक विकास संस्था, यशकल्प फाऊंडेशन, क्षितिज पर्व साप्ताहिक यांच्यावतीने आज 'स्नेहकुंज आधारगृह' येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
बंधू-भगिनीच्या अतूट बंधनाची साक्ष देणारा कार्यक्रम म्हणजे 'रक्षाबंधन'. आज बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून आपले संरक्षण करण्याची शपथ घ्यायला लावते. पुराणामध्ये यावर विविध कथाही आहेत.
आजच्या परिस्थीतीचं सर्वांना गांभीर्य आहे. त्यात सामाजिक कार्य करण्यात पुढे असलेल्या या संस्थांनी एकत्र येऊन वृद्धांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला.
आयुष्याची संध्याकाळ आनंदी जावी यासाठी ठिकठिकाणी आज वृद्धाश्रम, आधारगृह यांची रचना करण्यात आली. त्यात त्यांना कुठल्याही नात्याची उणीव भासू नये यासाठी सर्व सणवार साजरे केले जातात त्यात रक्षाबंधन हा तर बंधू-भगिनींच्या दृढ ऋणानुबंद साक्षी ठरणारा प्रेमळ सोहळा. हा सण त्यांच्यासोबत साजरा केल्यावर काही वृद्धांचे डोळेही पाणावले. 'आम्ही आहोत तुमच्यासोबत!' हे दिलासादायक शब्द त्यांना पुरेसे असतात. त्यात हे बंध म्हणजे त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता.
असा हा आनंद सोहळा आज 'स्नेहकुंज आधारगृह' येथे साजरा करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केटच्या सचिव सौ.योगिनी वैदू, संगीता नितीन जोशी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगीता जोशी, कार्यकारी विश्वस्त श्री.नितीन जोशी, यशकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.यशश्री बिडये, कार्यकारी विश्वस्त श्री.यशवंत बिडये, केवाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक व लायन लहू तातरे, क्षितिज पर्वचे संपादक श्री.सनीप कलोते, प्रसिद्ध गायक श्री.रवी जाधव, सौ.तातरे आदी मंडळी उपस्थित होती.
प्रथम कोरोना बाबतीत योग्य ती काळजी घेऊन नंतरच सर्वांना प्रवेश देण्यात आला.