पनवेल / प्रतिनिधी : पनवेलमधील सुकापूर भागातील नारळपाणी विक्रेत्याने ओळखीतल्या तरुणावर किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे, नवी मुंबई गु. रजी.क्र. 186/2020 भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे दि. 26/07/2020 रोजी दाखल करण्यात आला. यातील मयत व्यक्ती सद्दाम शेख वय 31वर्षे रा. आदई ता. पनवेल यांनी विनाकारण फोनवर शिवीगाळ का केली याबाबत आरोपी मेहबुब आलम वय 22 वर्षे मुळ रा. प्यारपुर , साहेबगंज, झारखंड यास विचारणा करण्यासाठी गेले असता दि.25/07/2020 रोजी 06:OO वा. च्या सुमारास सिडको गार्डनच्या बाजुला से. ११ नविन पनवेल येथे यातील आरोपी याने चाकूने पोठावर, छातिवर वार करून जीवे ठार मारून सदर आरोपी पळून गेला होता. त्यानुसार सदर गुन्हाच्या तपासाच्या अनुशंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकण पथकाचे पो.उप.निरी. रोंगे यांचे पथकाने सदर आरोपीचा कौशल्य पुर्वक तांत्रिक तपास करुन रेल्वे सुरक्षा बल, पोस्ट आरा, पटणा, राज्य बिहार यांचे मदतिने सदर आरोपीस दि. 27/07/2020 रोजी आरा रेल्वे स्टेशन, जिला- भोजपुर, राज्य- बिहार येथे ताब्यात घेतले असुन आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढिल तपास पो.नि. (गुन्हे) श्री. डी.डी. ढाकणे हे करीत आहेत.
हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड.