रोजगार बंद झाल्याने परिवारासहित त्याने हातगाडीवरच गाव गाठण्याचा घेतला निर्णय.
पनवेल,ता.18 ( प्रतिनिधी ) लॉकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या अनेकांनी अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेत पायी तसेच मिळेल त्या साधनाने गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.मूळचे सातारा येथील मात्र रोजगाराकरिता ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे राहणारे कोळेकर कुटुंब देखील हात गाडीवरून साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आपल्या गावी निघाले असून,3 मुले आणि पत्नी सह निघालेल्या या कुटुंबाला रस्त्यामध्ये अनेकजण होईल तशी मदत करत असल्याची माहिती कोळेकर यांनी दिली आहे.सातारा येथील रहिवाशी असलेले आनंद कोळेकर हे पत्नी आणि 3 मुलांसहित दिवा येथे 4 वर्षा पासून वास्तव्य करित आहेत.लालबाग मध्ये मिळेल ते काम करून गुजराण करणाऱ्या कोळेकर यांचे काम लॉक डाऊन मुळे बंद झाले असल्याने हाती असलेल्या पैशावर लॉक डाउनच 2 महिन्याचा कालावधी परिस्थिती सुधारेल या आशेने कोळेकर यांनी कसा तरी पार पडला.रविवारी 4 थ्या लॉकडाऊनची घोषणा होताच पैसे तसेच किराणा संपल्याने दिव्यात आता पुढील वास्तव्य करणे अवघड असल्याचे लक्षात आलेल्या कोळेकर यांनी सोमवारी पहाटे 5 वाजल्या पासून शेजाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या हातगाडीवर बिर्हाड घेऊन प्रवासाला सुरवात केली असून कधी पत्नी तर कधी स्वतः हात गाडी ढकलत जुन्या मुबंई - पुणे महामार्गावर कोळेकर कुटुंब प्रवास करत आहे.