जळगाव / जयवंतराव पवार
पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथील गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध समाजासाठी दफनभूमी होती . बौद्ध समाजाच्या लोकांसाठी स्वतंत्र दफन विधीची जागा मौजे शिरसोदे ग्रामपंचायतच्या अखत्यारीत होती . पूर्वी बौद्ध समाजाच्या लोकांसाठी दफनभूमीची जागा राखीव होती . त्यांच्या पूर्वजांना त्या जागेवर दफनही केले जात होते. परंतु अलीकडे या दफनभूमीच्या जागेवर शिरसोदे ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने दफनभूमीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून सध्या बौद्ध वस्तीतील तरुण / बालकांचा मृत्यू झाला तर त्यांचा दफनविधी करावा कुठे ? असा प्रश्न तमाम बौद्ध अनुयायांना भेडसावत आहे . संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता ते उलट आम्हाला प्रश्न विचारतात की , आपल्याकडे दफनभूमी बाबत काय पुरावा आहे ? असा प्रश्न विचारुन आमच्या समस्येला बगल देतात ग्रामपंचायतमध्ये दफनभूमीच्या जागे विषयी कोणत्याही प्रकारची नोंद नाही. असे सांगितले जाते . परंतु धर्मातराच्या अगोदर व धर्मातराच्या नंतर आमच्या अनेक पुर्वजांना या ठिकाणी दफन केले जात होते परंतु काही अविवाहित तरुण व लहान मुले - मुली दगावली ( मृत्यू झाला ) तर हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांचा दफनविधी करावा कुठे ? असा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे . यापूर्वी गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या पूर्वजांसाठी राखीव दफनभूमी होती . परंतु अलिकडे त्याच दफनभूमीच्या जागेवर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याने दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तरी बौद्ध समाजातील लोकांसाठी दफनभूमीच्या संबंधित जागेचा प्रश्न सोडवून आम्हाला दफनभूमीसाठी जागा मिळवून न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार आनंद पवार यांच्या सह शिरसोदे येथील समस्त बौद्ध अनुयायांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य ना. धनंजय मुंडे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासनला निवेदन देवून मागणी केली आहे.