पनवेल \ प्रतिनिधी : कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल - रायगड यांच्यावतीने समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून व आशा की किरण फाउंडेशनचे बशीर कुरेशी यांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील टावरवाडी या आदिवासी वाडीमध्ये तेथील मुले व नागरिकांसोबत बकरी ईदनिमित्त स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते तसेच आमचे जवळचे मित्र यांनी वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून काही रक्कम राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या या सत्कार्यास दिली तसेच आशा की किरण फाउंडेशनचे बशीर कुरेशी यांनी 30 किलो मटण देखील बकरी ईदनिमित्त दिले त्यानुसार आज याठिकाणी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, राजपाल शेगोकार, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, अनुराग वाकचौरे, रोहन सिनारे, अमित पंडित, गौरव भेंडे यांच्यासह सतीची वाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ज्या नागरिकांना समाजसेवा करण्याची वा दान करण्याची इच्छा असेल किंवा ज्यांना वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपले पैसे सत्कार्यास लावायचे असल्यास त्यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल 9320646555, 7400119797 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी यावेळी केले आहे.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे आदिवासी वाडीवर स्नेहभोजन करून बकरी ईद साजरी.