पनवेल - शिवसेनेच्या पनवेल विधानसभा समन्वयक म्हणून रोडपाली येथील प्रदीप ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने,व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या संमतीने ठाकूर यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र जिल्हा प्रमुख शिरीष घरत याच्या कडून देण्यात आल्याने परिसरातील शिवसैनिकांकडून ठाकूर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.पक्षाने टाकलेल्या विश्वासास पात्र होऊन या पुढे पनवेल मधील पक्ष वाढी करिता झपाट्याने कामाला लागणार असल्याचे मत ठाकूर यांनी नियुक्ती नंतर व्यक्त केले.
प्रदीप ठाकूर यांची सेनेच्या विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती.