राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे रक्षाबंधन निमित्त आदीवासी वाडीतील भगिनींना व लहान मुलींना पवित्र राख्यांचे वाटप. 

पनवेल / प्रतिनिधी : कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद आहेत व काही दिवसांवर धार्मिक सण आलेले आहेत. २ दिवसांवर रक्षाबंधन आली असताना अनेकांनी ऑनलाईन राखी खरेदी केली आहे. मात्र आदिवासी वाडी व गरीब लोकांना ऑनलाईन काय आहे अद्यापही माहिती नसून त्यांचा देखील रक्षाबंधन सण साजरा होऊन बहीण भावांचे नाते कायम चांगले राहावे म्हणून नुकत्याच येणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे टावरवाडी येथील महिला भगिनी व लहान मुलींना पवित्र राख्यांचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. रक्षाबंधन सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. याच जाणिवेतून व कोरोना सारख्या संकटात राखी मिळणे मुश्किल झाले असताना मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून  पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडीवरील महिला भगिनी व लहान मुलींना आकर्षक राख्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आनंद होते. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले आहे व शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यावेळी  पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, राजपाल शेगोकार, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, अनुराग वाकचौरे, रोहन सिनारे, अमित पंडित, गौरव भेंडे यांच्यासह सतीची वाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सुरज दादा गेहलोत व आशा गेहलोत यांनी विशेष सहकार्य केले.