राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे आदिवासी व गरीबवस्तीतील बालगोपाळांसोबत स्नेहभोजन करून दहीहंडी साजरी 

 



राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे आदिवासी व गरीबवस्तीतील बालगोपाळांसोबत स्नेहभोजन करून दहीहंडी साजरी 
पनवेल / प्रतिनिधी :  छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल - रायगड यांच्यावतीने समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी गोकुळाष्टमी व दहीहंडीच्या निमित्ताने गरीब वस्तीतील व आदिवासी वाडीतील बाळगोपाळांसोबत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील रिटघर गावातील आदिवासी वाडीवरील बालगोपालांसोबत दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे, ओमकार महाडिक, अमित पंडित, गौरव भेंडे, रोहन सिनारे, सचिन गणेचारी, तेजस काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Popular posts
महाराष्ट्र नवनिर्माणसेना तर्फे गुरुद्वाराचे माझी अध्यक्ष व संस्थापक सदस्य श्री. हरचंद सिंह सग्गु यांना सन्मानित
Image
जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचा राष्ट्रवादी मध्ये येण्याचा ओघ सुरूच
Image
काँग्रेस मुखपत्र साप्ताहिक प्रशिकचे अनावरण काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांच्या हस्ते
Image
पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती बाळ आणि बाळंतीण सुखरूप,10 महिन्यातील दुसरी घटना
Image