राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पनवेल तालुकाध्यक्ष व पत्रकार संतोष आमले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे वलप येथील आदिवासी वाडीत जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.


पनवेल / प्रतिनिधी : मा. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे कोरोना काळामध्ये अनेकांना मदतीचा हात देऊन विविध सामाजिक उपक्रम पनवेल तालुक्यात व रायगड जिल्ह्यात राबविले गेले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून विविध समाजोपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबविले जातात. कोरोनासारख्या संकट काळात देखील संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते न थांबता सदैव कार्यरत आहेत. आज दिनांक २५ जुलै २०२० रोजी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील वलप ( फणसवाडी) येथे समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून गोर - गरीब व गरजू आदिवासी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, ओमकार महाडिक, विजय शिंदे, अनिल दुन्द्रेकर, राजपाल शेगोकार, देवदास सोनावणे, कैलास रक्ताटे, सुरेश भोईर,तेजस काळे, अमित पंडित यांच्यासह वलपमधील ग्रामस्थ उपस्थित होते.