एम . एन.एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के.

एम . एन.एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के.


जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एम . एन.एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. सन 2019 - 2020 इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये कुमारी. चौधरी अनिशा  ज्ञानदेव  89.00%(प्रथम क्रमांक) , कुमार.घरत आर्यन बाळकृष्ण  87.20%(द्वितीय क्रमांक), तर कुमारी .धाकेड इशिका भगवतीलाल  86.40%  (तृतीय क्रमांक) गुण संपादन करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय श्री.रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.अरुण शेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय श्री. वाय .टी .देशमुख , संस्थेचे सचिव माननीय श्री. डॉक्टर सिद्धेश्वर गडदे ,विद्यालयाचे  चेअरमन माननीय श्री. भार्गव  ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता न्यूटन,यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


१) प्रथम क्रमांक कुमारी. चौधरी अनिषा ज्ञानदेव=89.00%

२) द्वितीय क्रमांक कुमार.घरत आर्यन बाळकृष्ण=87.20%

३) तृतीय क्रमांक कुमारी. धाकेड इशिका भगवतीलाल=86.40%