नेरुळ येथील भटके श्वान झाले जेरबंद

नेरुळ येथील भटके श्वान झाले जेरबंद



 नेरुळ सेक्टर 2 येथील भटके श्वानांचा त्रास नागरिकांना होत होता. सध्या लॉकडाऊनमुळे प्राणी व पक्षांचे देखील  हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर हे भटके श्वान धावून जात असून नागरिक व बाईक्सवारांना जीवमुठीत घेऊन घराबाहेर पडावे  लागत आहे. 
     नेरुळ सेक्टर 2 बळीराम जोशी मार्ग, राजीव गांधी ब्रिजखाली  व सेक्टर 4 येथील मार्गांवर भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे लहान मुले व महिलांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले होते. ही बाब नागरिकांनी भाजपाच्या युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांना सांगताच त्यांनी तातडीने महापालिकेला कळवताच पालिकेच्या श्वान पथकाकडून तातडीने त्यांना पकडून नेण्यात आले. त्यामुळे प्रभागात निर्माण झालेले भीतीचे वातवरण दुर झाले असून नागरिकांनी सुहासिनी नायडू यांचे आभार मानले आहेत.