नेरुळ मधील गोरगरिबांना अन्नवाटप करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा.
नेरुळ मधील गोरगरिबांना अन्नवाटप करुन.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस “भारतीय जनता युवा मोर्चा”च्या नवी मुंबई युवती अध्यक्ष सुहासिनी नायडू आणि नेरुळ मधील पदाधिकारी ऑड्री मोराईझ, सुवर्णाताई होसमनी, राजेश्री भट्ट, कांचन झा आणि इतर कार्यकर्त्यांनी साजरा केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस नवी मुंबई नेरुळमध्ये साजरा करण्यात आला. “भारतीय जनता युवा मोर्चा”च्या नवी मुंबई युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी परिसरातील गरिबांना दुपारी आणि रात्री अन्न वाटप केले. तसेच कोविड आजाराशी लढण्याकरिता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.
सदर प्रसंगी सर्व महिलांना एकत्रित करुन कोरोना या आजारपासून स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि योगा कसे करायचे, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे सध्या रोजगार ठप्प आहेत. यात सर्वाधिक हाल गरिबांचे होत आहेत. सदर बाब लक्षात घेत अन्न वाटप करण्यात आले. तसेच यापुढे देखील अन्न वाटप केले जाईल, असे यावेळी सुहासिनी नायडू यांनी जाहीर केले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी जयश्री चित्रे, ऑड्री मोराईझ, सुवर्णा होसमनी, राजश्री भट्ट, कांचन झा, अजय पासवान आणि कार्यकर्ते उपस्थित होते.