फाटके कपडे घालून घेतली प्रशासनाची भेट. पनवेलमधील रिक्षाचालकांच्या मागणीसाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा पुढाकार.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब जिल्हा संघटक केवल महाडीक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच पनवेल तालुकाध्यक्ष संतोष शिवदास आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाळासाहेब जगदाळे, वसंत मोरे, राजपाल शेगोकार याशिष्टमंडळाने पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांसाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांच्यातर्फे पनवेल महानगपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांना आज दिनांक 21 जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने निवेदन देण्यात आले. प्रशासनाने रिक्षासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच आज रिक्षा चालक उपासमारीने हैराण झाला आहे, त्यात पोलीस कारवाईला वैतागला असून संयम सुटत चालला आहे तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा रिक्षा चालकांचा उद्रेक होईल जर आपण लवकर निर्णय घेतला नाही तर होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे स्पष्ट मत शिष्ट मंडळाने अतिरिक्त आयुक्तांना सांगितले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष संतोष शिवदास आमले, पनवेल तालुका उपाध्यक्ष विजय दुद्ररेकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, पनवेल अध्यक्ष वसंत मोरे, वंदे मातरम रिक्षा संघटनेचे राजपाल शेगोकार, अशोक पाटील, देवदास सोनावणे आदी यावेळी उपस्थित होते.