नेरुळ सेक्टर – २, ४ मधील धोकादायक झाडांची छाटणी.
नवी मुंबई :
‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या युवती नवी मुंबई अध्यक्ष सुहासिनी रमेश नायडू यांच्या अथक प्रयत्नांनंतर नवी मुंबई महापालिका नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे यांनी नेरुळ प्रभाग क्रमांक -८४, नेरुळ सेक्टर – २ आणि ४ मधील धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक -८४ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक -८४ मधील रस्त्यावर तसेच पदपथावर असलेली धोकादायक झाडे उन्मळून पडत आहेत. त्यामुळे धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी सुहासिनी नायडू यांनी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा केली होती. मात्र, मागणी करुनही धोकादायक झाडांची छाटणी केली जात नव्हती. अखेर धोकादायक झाडांची छाटणी करण्याबाबत सुहासिनी नायडू यांनी महापालिका नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत नेरुळ सेक्टर-२ आणि सेक्टर – ४ मधील धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासन नुसार संजय तायडे यांनी महापालिका उद्यान विभागाची वाहने लावून नेरुळ वॉर्ड क्रमांक-८४ मधील सर्व धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे काम सुरु केले. महापालिका नेरुळ विभाग द्वारे नेरुळ सेक्टर-२ आणि सेक्टर -४ मधील धोकादायक झाडांची छाटणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मागणीला मान देऊन तातडीने धोकादायक झाडांची छाटणी केल्याबद्दल महापालिका नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे आणि उद्यान विभाग अधिकारी रोहेकर यांचे सुहासिनी रमेश नायडू यांनी आभार मानले आहेत.