पनवेल / प्रतिनिधी : श्रीमती संध्या दादुराम जोशी राहणार माणघर पोस्ट-कुंडेवहाल,तालुका-पनवेल जिल्हा रायगड या त्यांचा मुलगा कु.सागर दादुराम जोशी या जातीने महार असून माणघर येथे राहतात तिथेच मोसारे गावठानात त्यांची वाहिवाटीची जागा आहे आणि तिथे भाजीपाला पिकवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या परंतु कुर्ला येथील राहणार श्री.किरण पवार यांनी गावचे सरपंच यांचे पती रमेश पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांच्या सोबत संगनमताने श्रीमती संध्या दादुराम जोशी यांच्या वाहिवाटीची जमीन त्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर त्या जमिनीचा सौदा केला. तसेच अनधिकृत बांधकामास ही सुरवात केली. हा सर्व प्रकार लक्षात येताच सागर जोशी ग्रामपंचायतीस पत्रव्यवहार करून सदर बेकायदेशीर बांधकाम थांबवावे अशी विनंती केली. परंतु स्वतः सरपंच मॅडम यांचे पती रमेश पाटील यांचाच या अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीय जमीन व्यवहारात लागेबांधे असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत कडुन सुद्धा कोणतेही कायदेशीर कारवाई किरण पवार यांच्यावर न होता सरपंचाचे पती आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सागर जोशी यास धमकी देऊन सांगितले की तु या व्यवहाराच्या मध्ये पडु नकोस तू अजून बच्चा आहेस नाय तर तुला बघून घेऊ. तरी सुद्धा सागर याने कायदेशीर लढाई चालुच ठेवली पंचायत समिती,तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार चालुच ठेवला त्या मुले किरण पवार याने कुर्ला वरून गुंड बोलावुन पिस्तूलचा धाक दाखवुन सागर यास धमकी सुद्धा दिली की तुला बाप तर नाही आईचा एकटाच आहेस शहाणा हो आणि गप्प बस नाही तर तुला दाखवेन किरण पवार काय आहे ते. तसेच स्वप्नील पाटील व त्याचे वडील या सर्व प्रकरणात सागर जोशी यास मदत करण्याच्या संशयावरून स्वप्नील पाटील यास खोट्या अट्रोसिटी केसमध्ये अडकवण्याचा कुटील डाव सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सोबतीने किरण पवार याने आखला होता.या अगोदर ०२ वर्षांपूर्वी सुद्धा किरण पवार यांनी स्वप्नील पाटील आणि त्यांच्या वडिलांवर खोटी अट्रोसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.आणि त्यावेळी सिद्ध ही झाल होत की किरण पवार यांच्या कडुन खोटी अट्रोसिटी दाखल केली होती. वरील सर्व प्रकरणात किरण रमेश पवार कुर्ला यांचे नातेवाईक मंदा रमेश पवार कुर्ला, संगीता रवींद्र गायकवाड रोडपाली, रविना अक्षय गायकवाड रोडपाली, अक्षय रवींद्र गायकवाड रोडपाली, राहुल दिनकर खंडागळे, देवीचा पाडा, राजेश राहुल खंडागळे देवीचा पाडा, संदेश राहुल खंडागळे, देवीचा पाडा हे सर्व सतत माणघर येथे येऊन श्रीमती संध्या दादुराम जोशी आणि सागर दादुराम जोशी यांना शिवीगाळ आणि धमकी देवुन मानसिक त्रास देत आहेत. या बाबत सागर जोशी यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सदर प्रकरणात पनवेल शहर पोलीस स्टेशन जाणूनबुजून दुर्लक्ष करून अप्रत्यक्षरित्या किरण पवार यास सहकार्य करत आहेत आणि श्रीमती संध्या दादुराम जोशी आणि सागर दादुराम जोशी यांच्यावर अन्याय करत आहेत.या सर्व प्रकरणामुळे संध्या जोशी आणि त्यांचा मुलगा सागर जोशी किरण पवार याच्या दहशतीमुळे प्रचंड दहशतीत असुन मानसिक तणावात आहेत. त्यामुळे एका विधवा मातेला व तिच्या एकुलत्या एक मुलाला पनवेल शहर पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील अनेकांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे व सागर जोशी यांना योग्य न्याय न मिळाल्यास ते नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या दालनामध्ये उपोषणाला देखील बसणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे. तसेच अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी लवकरच जोशी कुटुंबीय सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते.
न्याय न मिळाल्यास पोलिस आयुक्तांच्या दालनात करणार उपोषण : सागर जोशी. खोट्या केसेस केल्याचा जोशी यांचा दावा.