प्राचार्य डॉ.गणेश ठाकुर जसखार गावचे सुपुत्र
उरण मधील अनेक व्यक्ति चमकत आहेत राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर.
डॉ गणेश ठाकुर यांनी केले उरणचे नावलौकिक.
उरण दि 1(विठ्ठल ममताबादे)महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेलचे प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव, उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र डॉ गणेश ठाकुर यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कॉउन्सिल सदस्यपदि निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सर्वच क्षेत्रातुन डॉ गणेश ठाकुर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ही निवड योग्य आणि सार्थ असल्याचे मत सर्वच क्षेत्रातुन व्यक्त होत आहे.
उरण तालुक्यातील जसखार गावाचे सुपुत्र डॉ गणेश ठाकुर हे लहानपणा पासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते.उच्च शिक्षित व सुसंकारित असलेल्या ठाकुर यांनी मुंबई विद्यापीठातून पी.एच.डि चे शिक्षण पूर्ण केले. रयत शिक्षण संस्थेच्या फुंड़े येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्यानंतर पनवेल येथील महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर त्यांची नियुक्ति झाली. त्यांच्या सेवेच्या काळात त्यांनी राबविलेले विविध उपक्रम व कार्याची दखल घेवून डॉ गणेश ठाकुर यांची निवड मॅनेजिंग कॉउंसिल सदस्यपदि करण्यात आली आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा मुंबई विद्यापीठा तर्फे बेस्ट प्रिंसिपल अवार्ड ने त्यांचा सन्मान करण्यात आला शिवाय रायगड भूषण, कोकणरत्न अशी अनेक पुरस्कार त्यांना आपल्या आयुष्यात मिळाली आहेत. डॉ गणेश ठाकुर यांचे वडील उरण पंचायत समितीचे माजी सभापती कै. अनंत नारायण ठाकुर,कै. प्राचार्य एच आर मढवी,डॉ विकास ठाकुर, प्रदीप ठाकुर, आई, पत्नी जयश्री ठाकुर, त्यांच्या सर्व बहिनी या सर्वांचे त्यांच्या यशात महत्वाचे योगदान असल्याचे ते नेहमी नमूद करतात. डॉ गणेश ठाकुर यांनी आपल्या दोन्ही अपत्यांना उच्च शिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची जेष्ठ कन्या सायली ही मुंबई विद्यापीठ मधील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर मुलगा जर्मनीमध्ये बिझनेस डेवलोपमेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यावरून लक्षात येते की ते एक उत्तम आदर्श प्राचार्य, प्राध्यापक आहेतच शिवाय एक उत्तम आदर्श वडील देखील आहेत.