पनवेल/प्रतिनिधी: कोरोना विषाणू साथीचा आजार दिवसेंदिवस वाढत चालला असून यामुळे पनवेल तालुक्यात लॉक डाऊन देखील वाढविण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिका, पनवेल तालुक्यात समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून मोफत निर्जंतुकीकरण करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील कसळखंड गावात मोफत जंतूनाशक फवारणी अभियान राबविण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्रीफळ फोडून व नमन करून जंतुनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कसळखंड ग्रामपंचायत सरपंच अनिल पाटील, दत्ता गायकर, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे गुळसुंदे विभाग प्रमुख कमलाकर जुनघरे, डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये, प्रवीण कवडे, प्रथमेश मते, सुशांत पाटील, रोशन पाटील, कल्पेश पाटील, ओमकार जुनघरे, सौरभ पाटील, विजय शिंदे, ओमकार महाडिक आदी उपस्थित होते. राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांच्यावतीने संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उरण विधानसभा मतदार संघातील कसळखंड गावात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे मोफत जंतुनाशक फवारणी.