रेल्वे प्रवासाचा लाभ पत्रकारांनाही मिळावा. आदिवासी महिला समाजसेविका कविता निरगुडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. 


रेल्वे लोकल प्रवासाची सुविधा, इतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्याप्रमाणे पत्रकार बंधू - भगिनींनाही मिळावे अत्यावश्यक सेवेत असलेल्या शासकीय व आरोग्य कर्मचारी, पोलीस महसूल अधिकारी कर्मचारी आदींसाठी रेल्वे लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी पत्रकारांनाही अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ केले आहे या आकालावधीत आपल्या परीवरचा विचार न करता धोका स्वीकारून पत्रकार बंधू भगिनी नागरिकांना करोना विषयक माहिती देण्याचे व जनजागृतीस्तव प्रबोधन करण्याचे काम करताना निदर्शनास येत आहेत. वार्तांकनासाठी पत्रकार बंधू भगिनीना अनेकदा मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई तसेच अन्य शहरात जावे लागत आहे त्यामुळे पत्रकार बंधू - भगिनींची ओघानेच गैरसोय होताना निदर्शनास येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा लाभ पत्रकारांनाही मिळावा अशी मागणी आदिवासी महिला समाजसेविका कविता निरगुडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.