पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगर पालिका क्षेत्रात बदामाची हजारो झाडे आहेत त्या झाडांचीफळे गटारात, कचऱ्यात जात आहेत. आजच्या काळात बदामाची किंमत १००० रुपये प्रति किलो इतकी आहे. तरी अन्न हे पूर्णब्रम्ह आहे याची दखल घेऊन बदामाच्या झुडांची फळे गटारात व कचऱ्यात जाण्यापेक्षा ती महापालिकेने गोळा करावी अशी मागणी राष्ट्रीय क्रांतिवादी पॉवरचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. ऍड. आर. के. पाटील यांची पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त यांना लेखी पत्र देऊन केली आहे.
पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील बदामाच्या झाडांची फळे जमा करावीत : ऍड. आर. के. पाटील यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी.