राजगुहावर जगाला लाजवेल असे कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करा : पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सचिन तांबे यांची मागणी. 


पनवेल /प्रतिनिधी : विश्वभुषण बोधीसत्व परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई दादर स्थित मानवतेचे एकोप्याचे दर्शन घडवणारे राजगृहावर या देशाला कलंक असणाऱ्या अप्रवृतींनी संपुर्ण जगाला लाजवेल असे अंधाऱ्या रात्री कृत्य केले आहे अशा या अपप्रवृती विकृत लोकांना भिम आनुयायी व महाराष्ठ्र राज्याच्या तमाम जनतेच्या वतीने महाराष्ठ्राचे सन्मानिय गृहमंत्री आनिलजी देशमुख , पोलिस महासंचालक सुबोध जस्वाल, महाराष्ट्राचे सन्माननिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ठ्राचे सन्माननिय मुख्यमंत्री उध्ववजी बाळासाहेब ठाकरे यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ठ्रीय नेते प्राध्यापक जोगेंंद्र कवाडे सर , राष्ठ्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा युवाध्यक्ष सचिनजी भिवदास तांबे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावनांचा आदर राखुन महाराष्ठ्राचे सन्मानिय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना ई मेल करुन दोषिंवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.