पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल शहरात असलेल्या अमरधाम स्मशानभूमीतील देहदाहिनीच्या चिमणीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मनसेचे पनवेल शहर उपाध्यक्ष प्रकाश लाड सदर ठिकाणी चिमणीची उंची वाढवावी अशी मागणी महापालिकेकडे केली आहे.
कोराना च्या काळात पनवेल शहरातील मृत्युचे प्रमाण लक्षात घेता अमरधाम स्मशांन भुमितील विदयुत देह दाहिनी च्या मधुन होणारा धुर हा तेथील जवळ पास असणाऱ्या मोनिश पार्क, आशियाना, धवलगिरी इमारती मधील लोकांना तसेच इतरत्र राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तसेच त्यांना दम्यासारख्या आजाराची लागण होत आहे.
इमारतीच्या खिडकीवर व इतरत्र राखेचे थर येतात म्हणून देह दाहीनींच्या चिमणीची उंची ३ ते ४ फुट वाढवावी. जेणे करुन लोकांना त्या धुराचा व राखेचा त्रास होणार नाही. त्यासाठी मनसे शहर अध्यक्ष शितल सिलकर यांच्या मार्गदर्शना खाली महापालिका आयुक्त याना पत्र देण्यात आले. यावेळी उपशहर अध्यक्ष प्रकाश लाड तसेच मनसे सैनिक संजय मुरुकुटे, विभाग अध्यक्ष गणेश गायकर हे उपस्थित होते.