केंद्रातील भाजप सरकार विरोधात, देशात होत असलेली लोकशाहीची पायमल्ली व लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारं अस्थिर करणे किंवा ती सरकारं पाडणे अश्या गलिच्छ राजकारण विरोधात रायगड जिल्हा युवक काँग्रेस वतीने पनवेल उपविभागीय कार्यालय, पनवेल येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व रायगड जिल्ह्याचे प्रभारी निखिल कवीश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य सावलेकर, चिटणीस निखील ढवले, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे, प्रवक्ता अरुण ठाकूर, सरचिटणीस काशीफ इमाम, पनवेल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत पाटील, उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित घरत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकार कडे राजस्थान येथील राज्य सरकार फ्लोर टेस्टी मागणी व कोरोना संदर्भात अधिवेशन घेण्याबाबत राज्यपालांकडे जी मागणी करत आहे त्यासाठी परवानगी द्यावी असे निवेदन देण्यात आले.
रायगड जिल्हा युवक काँग्रेसने केला केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध.