पनवेल / प्रतिनिधी : समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे व कोरोना साथीचा आजार कोविड -१९ साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून तसेच पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव राकेश मोरे यांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांसाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांच्यातर्फे पनवेलमधील रिक्षांना बुधवार दिनांक १ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता शबरी हॉटेलच्या मागे मोफत सुरक्षा पडदे लावण्यात आले. कोरोना काळामध्ये रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला असून रिक्षा सुरु करण्यासाठी शासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये रिक्षांना सुरक्षा पडदा लावणे, सॅनिटायझर ठेवणे, अधिक प्रवाशी न बसवणे यासारखे नियम आखले असल्याने सुरक्षा पडदा लावणे देखील रिक्षाचालकांना महाग वाटत आहे. याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पनवेलमधील रिक्षांना मोफत सुरक्षा पडदा लावून देण्याचे काम केले. यावेळी पनवेल तालुक्यातील २०० ते २५० रिक्षांना सुरक्षा पडदा लावण्यात आला. या उपक्रमाचे रिक्षाचालकांनी व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून केवल महाडिक यांना धन्यवाद दिले. यावेळी संस्थापक भारतीय मानवविकास ट्रस्टचे नंदकुमार जाधव, खजिनदार व विश्वस्त अतुल वाणी, पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, बाळा जगदाळे, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, अक्षय घाडगे, विजय शिंदे, वसंत मोरे, साईनाथ जाधव, राजपाल शेगोकार, अनिल दुन्द्रेकर यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.
पनवेलमधील रिक्षांना लावण्यात आले मोफत सुरक्षा पडदा. राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांचा उपक्रम. पनवेल / प्रतिनिधी : समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे व कोरोना साथीचा आजार कोविड -१९ साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून तसेच पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव राकेश मोरे यांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांसाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल यांच्यातर्फे पनवेलमधील रिक्षांना बुधवार दिनांक १ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता शबरी हॉटेलच्या मागे मोफत सुरक्षा पडदे लावण्यात आले. कोरोना काळामध्ये रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला असून रिक्षा सुरु करण्यासाठी शासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. यामध्ये रिक्षांना सुरक्षा पडदा लावणे, सॅनिटायझर ठेवणे, अधिक प्रवाशी न बसवणे यासारखे नियम आखले असल्याने सुरक्षा पडदा लावणे देखील रिक्षाचालकांना महाग वाटत आहे. याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी पनवेलमधील रिक्षांना मोफत सुरक्षा पडदा लावून देण्याचे काम केले. यावेळी पनवेल तालुक्यातील २०० ते २५० रिक्षांना सुरक्षा पडदा लावण्यात आला. या उपक्रमाचे रिक्षाचालकांनी व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून केवल महाडिक यांना धन्यवाद दिले. यावेळी संस्थापक भारतीय मानवविकास ट्रस्टचे नंदकुमार जाधव, खजिनदार व विश्वस्त अतुल वाणी, पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, बाळा जगदाळे, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, अक्षय घाडगे, विजय शिंदे, वसंत मोरे, साईनाथ जाधव, राजपाल शेगोकार, अनिल दुन्द्रेकर यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते.