प्रभाग क्रमांक 84 सेक्टर 2 येथे वारणा कॉलनी व घरकुल अपार्टमेंट येथे चक्री वादळाने झाडं पडले होते. तीन दिवस सतत पालिका कर्मचारी व आपले स्वतः चे स्वखर्च कर्मचारी लावून झाडं काढून घराचे मार्ग मोकळे करून देण्यात आले होते पण पालिकेतर्फे 20 दिवस झाले सोसायटीचे आतून पडलेले फ़ांद्या व पाकळ्या काढण्यात आले नव्हते खूप वेळा बोलण्यावर ही काम झालं नाही मग नागरिकानी सुहासिनी नायडू यांना संपर्क करून सुचविले कि सर्व फ़ांद्या तिथे पडून आहेत त्यात उंदीर मरत आहे व वास येत आहे.त्यानुसार दिनांक 30 जुन दुपारी 2 ते 6 वाजता आपले स्वतः खर्चाने माणसं लावून सर्व झाडांचे सर्व फांद्या व पाकळ्या सर्व काढण्यात आले आहे, तसेच वीज खांब पडून होते ते ही अधिकाऱ्यांना सुचवून तक्रार करून दिले या प्रसंगी आपले नेरुळ मंडळ चे महिला अध्यक्ष सौ सुवर्णा ताई होसमनी व युवकांचे मंडळ सरचिटणीस अक्षय शिरगावकर हे उपस्थित होते.
आपला प्रभाग हि आपली जबाबदारी अभिनयांतर्गत पडलेली झाडे आली उचलण्यात.