मौजमस्तीसाठी ऑटोरिक्षा, मोटार सायकल व घरफोडी करणाऱ्या आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केले अटक.           

         


पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटो रिक्षा व मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्यानुसार हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमी व तांत्रिक तपासाच्या आधारे वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला दिनांक २२ जुलै २०२० रोजी पनवेल येथून व दुसऱ्या आरोपीला २३ जुलै २०२० रोजी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने तृभे येथून अटक केली. अटक आरोपींकडून एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून हे आरोपी मौजमजेसाठी ऑटोरिक्षा व मोटारसायकल चोरून गॅस/पेट्रोल संपल्यानंतर वाहने सोडून देत असत सादर आरोपित तक्का पनवेल परिसरातील पानटपरीचे लॉक तोडून चोरी केलेलं सिगारेट, तंबाखू सुद्धा त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत. तसेच ऑटोरिक्षा क्रमांक एमएच ०६ झेड ३३५३ हस्तगत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये अशोक बाळकू उताले वय २० धंदा इलेक्ट्रिशियन रा, पंचशील नगर झोपडपट्टी नवीन पनवेल व अभिषेक प्रकाश बोराडे उर्फ अविनाश उर्फ बटक्या वय २० वर्षे धंदा ड्रायव्हर रा, चुनाभट्टी बोन्सारी गाव, तुर्भे एमआयडीसी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ मोटार सायकल, ४ ऑटोरिक्षा, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, सिगारेट व तंबाखू आदी माल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि निलेश राजपुरी, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, पोहवा विजय आयरे, नितीन वाघमारे, पोना प्रमोद शिंदे, पंकज पवार, नंदकुमार माने, गणेश चौधरी, अमरदीप वाघमारे, पोशी सुनील गर्दनमारे, म्हाळू आव्हाड, विवेक पारासूर, यादवराव घुले, राजू खेडकर यांनी केली आहे.