छत्रपती उदयनराजे भोसले यांची खासदारकीची शप्पथ घेतल्याबद्दल राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलतर्फे रविवारी अन्नदान.  

पनवेल / प्रतिनिधी : राज्यसभेच्या नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी बुधवारी दिल्लीत पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील यावेळी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यसभेच्या खासदारपदी शपथ घेतल्याने उदयनराजे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी देखील मी समाजसाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांची खासदारकीची शपथ घेतली त्यानिमित्ताने राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल -रायगड यांच्यावतीने गोर - गरीब आदिवासी नागरीकांना अन्नदान केले जाणार आहे. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून येत्या रविवारी दिनांक २६ जुलै २०२० रोजी खारघर येथील फणसवाडी या आदिवासी वाडीमधील नागरिकांना अन्नदान करण्यात येणार आहे असे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी सांगितले.