आदिवासी महिला समाजसेविका कविता निरगुडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साजरा केला वृक्ष लागवड कार्यक्रम.


पनवेल / प्रतिनिधी : "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे",१ जुलै हा वृक्षदिन म्हणून दरवर्षी भारतभर साजरा करण्यात येतो.तळागाळातील लोकांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून निसर्गचक्र  आबाधित ठेवण्यासाठी झाडांची लागवड करणे आणि त्यांची जोपासना करणे गरजेचे आहे.आणि प्रत्येकाचा झाडांविषयी ददुष्टीकोन बदलावा,झाडे लावा झाडे जगवा हे तळागाळातीलही लोकांनाही पटावे याच भावनेपोटी आदिवासी महिला समाजसेविका आदि.कविता निरगुडे ताई व त्यांचे विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी,सहकारी,मित्रमंडळी,आदि.चेतन बांगारे,सतीश जाधव, पांडुरंग गावंडा,प्रकाश शिद, चिंतामण जावळे,विष्णू गोरे,अनंता गावंडा,एकनाथ वारघडा,पंडित पारधी,सांज वाघ,मीना ठोंबरें,योगिता गोरे,समीर,यतीन,वैगरे व काही स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी अगदी खेळीमेळीमध्ये वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात करोना साथरोग महामारीच्या काळावधीतही सामाजिक अंतर राखून वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये हिरीहीरीने सहभाग नोंदविला.सदर वृक्षलागवड कार्यक्रम हा ठाकूरवाडी(मुळगाव),ता.अंबरनाथ,जि.ठाणे येथे साजरा करण्यात आला.रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आली.सदर रस्त्यातून जात असणाऱ्या वाटसरूना थांबवून एक-एक झाड बक्षीस म्हणून देण्यात आले. सदर झाड लावून  त्याची जोपासना करा असे सांगण्यात आले.काही स्थानिक ग्रामस्थांना आपापल्या परसबागेमध्ये एक-एक झाड लावण्यासाठी देण्यात आले.आदिवासी समाजसेविका आदि.कविता निरगुडे ताई आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी आणखीनही झाडांच्या रोपांची मागणी केली आहे.सदर झाडांची रोपे प्राप्त होताच काही गावांमध्ये फिरून घरोघरी एक एक झाड देण्याचा त्यांचा मानस आहे.कार्यक्रमास उपस्तिथीत सर्व बांधवाना आपल्या हाताने जेवण बनवून जेवू घातले व कार्यक्रमाची सांगता करून शेवटी आम्ही आदिवासी झाडे लावतो तुम्हीही झाडे लावा ! असा त्यांनी तमाम जनतेला आव्हान केले.