कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर नेरुळ सेक्टर २ येथे कोव्हीड १९ मास स्क्रीनिंग कॅम्प राबवा : भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांची मागणी. 


नवी मुंबई / प्रतिनिधी : नेरुळ सेक्टर २ हा विभाग  LIG चाळी व  बिल्डिंगमध्ये मध्यमवर्गीय जास्त लोकसंख्येने वसलेले आहे. कोरोना रूग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर २ परिसरात कोरोना रूग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे आपणास माहिती आहेच. नेरूळ सेक्टर २ LIG वसाहती मध्ये एका दिवसात दोन व सेक्टर ४ येथे  कोरोनाचे सहा रूग्ण आढळले आहेत. महापालिकेने प्रसिध्दीपत्रकात तसे नमूदही केले आहे. कोरोनाबाबत  नेरूळ सेक्टर २ व सेक्टर ४ मधील रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने सेक्टर २ LIG अंर्तगत रस्त्यांवर आजतागायत जंतुनाशक फवारणी केलेली नाही. कोरोना आजाराऐवजी त्याच्या भीतीनेच  नेरूळ सेक्टर २ मधील रहीवासी भयभीत झाले आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे व अन्य परिसरात महापालिका प्रशासनाकडून कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रमाणे नेरूळ सेक्टर २ व सेक्टर ४ परिसरात कोव्हिड १९ स्क्रिनींग कॅम्प लवकरात लवकर राबवावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.