नवी मुंबई / प्रतिनिधी : नवी मुंबई महानगर पालिका हद्दीतील नेरूळ वॉर्ड क्रमांक 84, सेक्टर 2 व सेक्टर 4 आणि जुईनगर याठिकाणी नवी मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून नेरुळ सेक्टर 2, 4 व जुईनगर वॉर्ड 84 येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या व डी. वाय. पाटील यांच्या माध्यमातून मास स्क्रिनींग शिबीराचे आयोजन करावे अशी मागणी १ जून रोजी आमदार मंदाताई म्हात्रे यांना व नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सुहासिनी नायडू यांनी केली होती. त्यानुसार पाठपुरावा केल्यानंतर सोमवार, दि. २२ जुन २०२० नवी मुंबई महानगरपालिका, शाळा क्रं 102, नवी मुंबई महानगरपालिका,सेक्टर 4, नेरूळ शिव मंदिर जवळ नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यत आयोजित करण्यात आले आहे. तरी नेरुळ वॉर्ड 84 सेक्टर 2 व सेक्टर 4 रहिवाश्यांनि या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी युवती अध्यक्षा सौ. सुहासिनी रमेश नायडू यांनी केले आहे.
२२ जून रोजी नेरुळमध्ये मास स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन. लाभ घेण्याचे सुहासिनी नायडू यांचे नागरिकांना आवाहन.
२२ जून रोजी नेरुळमध्ये मास स्क्रीनिंग शिबिराचे आयोजन. लाभ घेण्याचे सुहासिनी नायडू यांचे नागरिकांना आवाहन.