पनवेल पंचायत समितीचे मा.उपसभापती व विद्यमान सदस्य मा.श्री.वसंत आप्पा काठावले यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवळोली गावातील आदिवासी बांधव व अपंग व दिव्यांग बंधू-भगिनींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप. 

पनवेल पंचायत समितीचे मा.उपसभापती व विद्यमान सदस्य मा.श्री.वसंत आप्पा काठावले यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवळोली गावातील आदिवासी बांधव व अपंग व दिव्यांग बंधू-भगिनींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप. 


पनवेल पंचायत समितीचे मा.उपसभापती व विद्यमान सदस्य मा.श्री.वसंत आप्पा काठावले साहेब यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देवळोली गावातील आदिवासी बांधव व अपंग व दिव्यांग बंधू-भगिनींना कोरोना सारख्या संकटामुळे घरी बसण्याची वेळ आल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी देवळोली चे तंटामुक्ती अध्यक्ष मा.सरपंच रामभाऊ पाटील, विद्यमान सरपंच मनोज भंडारकर व उपसरपंच गुरुनाथ पाटील यांच्या हस्ते सत्कारमुर्ती वसंतआप्पा काठावले यांचा शाळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मा.श्री.वसंत आप्पा काठावले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष अनंत पाटील, देवळोली ग्रामपंचायतीचे मा.सरपंच एन झेड पाटील, मा.उपसरपंच एच ए पाटील, मा.सरपंच जयदास पाटील, मा.उपसरपंच उदय झिंगे, मा.उपसरपंच शमील पाटील, मा.उपसरपंच गजानन बडवी, शेकापक्षाचे जेष्ठ नेते भगवान कोंडीलकर, पी पी पाटील, राजेश पाटील, के एस पाटील, मा.शाखाप्रमुख हसुराम दिघे, नारपोली चे कार्यकर्ते संजय डुके, ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजा पाटील, चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते मारुती काठावले, जेष्ठ नेते देविदास पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच अनिल काठावले, मा.सदस्य अरुण पाटील, युवा नेते सुनील पाटील, युवा नेते पवन काठावले, युवा नेते रुकेश काठावले, अमित घोगरे, योगेश भोईर, सुरज ठाकुर, सुजित पाटील, बंटी पाटील, देविदास महादेव पाटील, महे वामन पाटील, केतन पाटील, प्रतिक पाटील,  तसेच भाताण चे भरपूर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील व युवक काँग्रेसचे गुळसुंदे जिल्हा परिषद मतदारसंघाचे विभागाचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.