ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने मंगळवारी प्रभाग १८ मध्ये आर्सेनिक अल्बम
३० होमिओपॅथीक औषधाचे वाटप.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम.
पनवेल(प्रतिनिधी) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दिनांक २ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपचे पनवेल शहर मंडल सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने मंगळवार दिनांक ०२ जून रोजी प्रभाग १८ मधील नागरिकांना मोफत आर्सेनिक अल्बम३० होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
दानशूर व्यक्तीमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात. यावर्षी कोरोना जागतिक महामारी आहे, त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून आरोग्यदायी कार्यक्रम होत आहेत. त्या अनुषंगाने नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने प्रभाग १८ मधील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधाचे घरपोच वितरण केले जाणार आहे.