राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात आली पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील काळुंद्रे, नवीन पनवेल, पनवेल शहरातील मोहल्ला परिसरात मोफत जंतुनाशक फवारणी.


पनवेल / प्रतिनिधी : समाजसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदवाक्याप्रमाणे व कोरोना साथीचा आजार कोविड -१९ साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्रीमंत छत्रपती मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून निर्जंतुकीकरण करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत आज दिनांक 26 जून 2020 रोजी संध्याकाळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र.20 काळुंद्रे गावातील कॉलनी परिसरातील श्री.साई द्वारका प्लॉट नं.31 या रहिवाशी इमारत, नवीन पनवेल सेक्टर प्रजापती कॅस्केड, पनवेल शहरातील कापड बाजार येथील कृष्ण निवास, पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला, पवन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या परिसरात कोरोनाचे नियम व अटींचे पालन करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, तालुका अध्यक्ष संतोष आमले, अक्षय घाडगे, ओमकार महाडिक हे उपस्थित होते. यावेळी काळुंद्रे येथील रहिवाशी श्री.बालाजी सुर्यवंशी, कु.चंद्रकांत सुर्यवंशी, पवन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सुनिल पोतदार, रमण खुटले, नितीन भालेकर यांच्या तर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आभार मांडण्यात आले.