राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेलच्या वतीने पनवेल तालुक्यातील महिला रिक्षाचालकांसाठी मोफत "कोरोना आरोग्य विमा "
पनवेल / प्रतिनिधी : कोरोना साथीचा विषाणू कोविड 19 हा आजार पनवेल तालुक्यात वेगाने फैलावत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या रिक्षाचालकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे यामुळे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत त्यातच एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर तपासणी करण्यासाठी देखील रिक्षाचालकांकडे पैसे नाहीत याच जाणिवेतून पनवेल तालुक्यात रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिला रिक्षाचालकांचा मोफत कोरोना आरोग्य विमा काढण्याचे काम राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले व उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर यांनी आयोजिले असुन पनवेल तालुक्यातील महिला रिक्षाचालकांनी याबाबत तात्काळ 9320646555, 7400119797, 9220403509, 9833294421 या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावी व योग्य ती कागदपत्रे संस्थेकडे जमा करावी अथवा kmahadik55@gmail.com rajepratisthanpanvel2020@gmail.com यावर मेल करावी असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.