पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील नेरेपाडा विभागातील समाज सेवक तथा उद्योजक रमणशेठ खुटले यांचा मुलगा कुमार अर्णव याचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने राहत्या घरी साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात जपून त्यांनी हरीग्राम येथील वृद्ध नागरिकांसाठी छत्र्यांचे मोफत वाटप केले. जगात तसेच देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना आपल्या मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता तसेच काही समाज उपयोगी उपक्रम राबवावा ही इच्छा मनात ठेवून त्यांनी सदर गरजू वृद्धांसाठी छत्रि वाटपाचा कार्यक्रम राबविला. पावसाळ्याचे दिवस असल्याने वृद्ध शेतकरी शेतावर कामासाठी जात असताना त्यांना छत्रीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी हा कार्यक्रम हरीग्राम गावात केला. त्यावेळी स्वतः उद्योजक रमण शेठ खुटले, प्रसिद्ध उद्योजक तथा साप्ताहिक कोकण संध्याचे कार्यकारी संपादक संजयभाई नोगजा, मुख्य संपादक तथा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक सहसंपादक ओमकार महाडिक संपादक दीपक महाडिक, पत्रकार मयूर तांबडे, अक्षय घाडगे, पनवेल एपीएमसीचे संचालक संतोष पाटील, माजी सरपंच नरेश पाटील यांच्यासह हरिग्राम गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अर्णव रमण खुटले यांच्या वाढदिवसानिमित्त हरिग्राम येथील वृद्धांना छत्रीवाटप.