पनवेल : हिंद भारतीय जनरल कामगार सेने चे अध्यक्ष निलेश (आप्पा) पराडकर यांच्या नेतृत्वाखाली जय प्रेसिशन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( मोहपाडा -पनवेल ) येथील कंपनी च्या 450 सदस्यांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले.
याप्रसंगी सदस्य नोंदणी शुल्क संघटनेच्या महाराष्ट्र चिटणीस सौ. अपूर्वा प्रभू आणि रायगड जिल्हा सरचिटणीस केवल माळी यांनी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने स्वीकारल्याची माहिती हिंद भाारतीय जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस घनःश्याम नाईक यांनी दिली.
जय प्रेसिशन प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांनी स्वीकारले हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सभासदत्व.