नवी मुंबईत दारूची होम डिलिव्हरी, दुकाने मात्र बंदच.
नवी मुंबई / प्रतिनिधी : नवी मुंबईत दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार उद्यापासून म्हणजे रविवारपासून घरपोच सेवा देण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे. पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याने दारूची दुकानं मात्र बंदच राहतील, असं आदेशात म्हटलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र दारू मिळणार नाही, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य शासनाने LOCKDOWN 4.0 मध्ये दिलेल्या परवानग्यांमध्ये अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कंटन्मेंट झोन वगळता अन्यत्र दारूची घरपोच विक्री करता येईल. ऑनलाईन दारूविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. दुकानं मात्र बंदच राहतील. राज्य शासनाने दारूविक्रीला परवानगी दिल्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. नवी मुंबईकरांचीसुद्धा दारूसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला होता. त्यामुळे लगेचच हा निर्णयम मागे घेत दारूची दुकानं नवी मुंबईत बंद झाली होती. आताही दारूची दुकानं, काउंटरवरून मिळणाऱ्या दारूसाठी बंदच राहतील, पण ऑर्डर नोंदवून घरी मागवता येईल, असं या आदेशावरून स्पष्ट आहे.
नवी मुंबईत दारूची होम डिलिव्हरी, दुकाने मात्र बंदच.