दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पत्रकारांना आर्थिक मदतीचा ओघ सुरूच. पनवेलमधील पत्रकारांना पुन्हा प्रत्येकी १० हजारांची मदत. 


पनवेल / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या दानशूरपाणाबाबत संपूर्ण रायगड जिल्हा परिचित आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडे आलेला माणूस कोणीही असो तो कधीच खाली हात परतला नाही अशी ख्याती त्यांची संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कोरोना साथीचा आजार व लॉकडाऊन याकाळामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांनी केलेली मदत खरंच कौतुकास्पद आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी पनवेलमधील पत्रकारांना आर्थिक मदत करण्याबाबत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना पत्र लिहले होते त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पनवेलमधील सर्व पत्रकार संघटनांच्या अध्यक्षांना बोलावून त्यांच्याकडे प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली तसेच वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन देखील केले. पत्रकारांना सर्वात पहिले मदत करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे होते त्यांनतर अनेकांनीही मदत केली मात्र आज ती मदत देऊन एक महिना उलटला त्यानंतर देखील पनवेलमधील पत्रकारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची पुन्हा आर्थिक मदत केली. या मदतीमुळे लॉकडाऊन काळामध्ये अडचणीत आलेल्या पत्रकारांना दिलासा मिळाला असून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे पनवेलमधील पत्रकरांनी आभार मानले असून पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांच्या पत्राची दखल घेतल्याबद्दल केवल महाडिक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे विशेष आभार मानले.