सावळे - आपटे रोड इंडिया बुल्स याठिकाणी असणाऱ्या पनवेल / प्रतिनिधी : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार हे कोरोना विषाणू साथीचा आजारा विरोधात लढण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी शासन प्रयत्न करीत असताना काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे आजार पसरू लागल्याचे चित्र आहे. कोरोना आजाराचा रुग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना वा प्रशासनाला देणे गरजेचे असताना रायगड जिल्ह्यातील सावळा - आपटे रोड येथे असणाऱ्या आष्टे लॉजिस्टिक अँड कंपनी याठिकाणी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले असून यातील एक जण फरार असल्याचे माहिती घेताना समोर आले आहे तसेच यानंतर दिनांक २१ मे रोजी पुन्हा ३ रुग्ण भेटून आले असून सदर रुग्णांची माहिती कंपनीकडून योग्य वेळी दिली गेली असती तर रुग्णांमध्ये वाढ झाली नसती मात्र काम बंद होईल याभीतीने हि माहिती कंपनीने लपवली तसेच याठिकाणी भेट दिली असता याठिकाणी मास्क न लावणे, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना तपासणी करण्यासाठी तापमान तपासण्याची मशीन नसणे, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांची नोंद नसणे यासारख्या गोष्टी दिसून आल्या. आपल्या कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या आदेशात सर्व अटी नियमांचे पालन करून कंपनी सुरु ठेवण्यास कळवले होते मात्र आष्टे लॉजिस्टिक यांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा देखील नोंद करावा अशी मागणी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिनांक १७ मे रोजीच पत्र पाठवून केली आहे.
आष्टे लॉजिस्टीक अँड कंपनीवर कारवाई करा ! राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे प्रशासनाला निवेदन.