लॉकडाऊन काळातील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा : नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांची मागणी. 

लॉकडाऊन काळातील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा : नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांची मागणी. 
 पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र कोरोना साथीचा आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व जनतेला घरी राहावे लागत असल्याने अनेकांचे उत्पनाचे मार्ग देखील बंद झाले असल्याने सर्व जनतेला त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याचबरोबर घरी राहिल्यामुळे व उन्हाळा असल्याने घरातील पंखे, टीव्ही, एसी चालू असतात त्यामुळे विजेचा वापर देखील अधिक होत आहे. त्यामुळे लाईट बिलामध्ये देखील साहजिकच वाढ होत आहे. तसेच महावितरणतर्फे घरोघरी जाऊन मीटर रिडींग न घेतल्यामुळे वाढीव वीजबिल देण्यात आलेले आहे मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी महावितरणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे केली आहे.