माझे शहर माझी जबाबदारी –विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे जपतात सामाजिक बांधिलकी. 

माझे शहर माझी जबाबदारी –विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे जपतात सामाजिक बांधिलकी. 


पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चारीटेबल संस्था आणि एच. एच. एफ. हामनेमनियन होमिओ फोरम नवी मुंबई यांच्यातर्फे कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व विषाणूशी लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप पनवेलमधील सोसायट्यांमध्ये, सोसायटीतील सुरक्षारक्षक या सर्वांना करण्यात आले. यावेळी सोसायटीतील कमिटीचे पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सइन चे अंतर राखत सोसायटीतील कुटुंब संख्येनुसार गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि फोरमचे नवी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर न पडता आपल्या सोसायटीमध्ये आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आभार व्यक्त करण्यात आले.