पार्थ पवार फाउंडेशन  मार्फत तळोजामध्ये अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप !


आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारशक्‍ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक औषध अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप तळोजा फेज-1 व फेस 2 या  परिसरामध्ये पार्थ पवार फाउंडेशन  यांचेमार्फत करण्यात आले.


 सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा सहचिटणीस प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला.


 गेल्या काही दिवसापासून लोकांमध्ये या औषधाच्या संदर्भात जागरूकता निर्माण झाल्यानंतर लोकांकडून या औषधांची सतत मागणी होत होती. जवळजवळ 100  सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना व अन्य जनतेला या औषधाचा मोफत वितरण करण्यात आले.
सदर  कार्याचे कौतुक विविध थरातून होत आहे. या कार्यामध्ये प्रसाद पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील सचिन सोनावळे तपण विश्वास निरंजन विश्वास विजय पाटील विजय लोहार नितीन पाटील चंद्रशेखर मोरे या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व सोशल डिस्टन्स इन चे पालन करून सदर वाटप करण्यात आले