अबोली महिला रिक्षा चालक महिलांना नगरसेवक रवींद्र भगत यांचा मदतीचा हात. 

अबोली महिला रिक्षा चालक महिलांना नगरसेवक रवींद्र भगत यांचा मदतीचा हात. पनवेल/प्रतिनिधि: लॉकडाउन च्या काळात रोजगार बंद असल्याने आनेकांवर  उपासमारिची वेळ आली आहे. या काळात अबोली महिला रिक्षा चालकांवरही व्यवसाया अभावी उपाशी राहण्याची वेळ आली आहे..अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष: संतोष तू. भगत यांना कळंबोली मधील प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक श्री. रवींद्र भगत यांनी स्वतःहून संपर्क साधून महिलांची विचारपूस करून, आज रिक्षा चालक महिलांना अन्न धान्य वाटप केले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. नगरसेवक रवींद्र भगत यानी तत्परतेने  केलेल्या मदतीबदल कळंबोली तील सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले.