पनवेल / प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यामार्फत उद्योजक व पायल कलेक्शनचे मालक संजय जयकिशन नोगजा यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधांचे पनवेल तालुक्यातील रिक्षाचालकांना करण्यात आले. लिक्विड स्वरूपातील या औषधाचे वाटप नवीन पनवेल येथे करण्यात आले यावेळी १०० हुन अधिक रिक्षाचालकांना याचे वाटप पायल कलेक्शनचे मालक संजय नॊगजा, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, पत्रकार मित्र असोसिएशनचे सहसचिव संतोष आमले, राजे प्रतिष्ठानचे डेरवली विभाग अध्यक्ष किरण पालये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय नोगजा यांनी हे औषध कसे वापरायचे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले. कोविड १९ रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घ्यावी केंद्रीय विभागाच्या आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. कोरोनाची लागण रिक्षाचालकांना होऊ नये यासाठी आम्ही या औषधाचे वाटप करीत आहोत असे संजय नोगजा यांनी स्पष्ट केले. पनवेल तालुक्यातील आदई, नेवाळी, विचुंबे, पनवेल शहर, नवीन पनवेल, सुकापूर या भागातील रिक्षाचालकांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधांचे वाटप राजे प्रतिष्ठान व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यामार्फत उद्योजक व पायल कलेक्शनचे मालक संजय नोगजा यांच्या माध्यमातून करण्यात आले.
राजे प्रतिष्ठान पनवेल व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे उद्योगज संजय नोगजा यांच्या माध्यमातून पनवेल परिसरातील रिक्षाचालकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधांचे वाटप.