आराध्य प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनाश्यक वस्तुचे वाटप
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा पुत्र आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांचा नातू आराध्य म्हात्रे याचा 8 वा वाढदिवस पनवेल परिसरातील आश्रमात जीवनाश्यक वस्तुचे वाटप (19 मे) करुन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे वाढदिवसचा कोणताही गाजावाजा न करता आराध्याचा वाढदिवस गरीब व लहान मुलांच्या आश्रमात धान्य वाटप करून साजरा करण्यात आला.
सध्या देशभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. वाढदिवस म्हटले की तो मोठा गाजावाजाकरत साजरा केला जातो. मात्र आराध्य म्हात्रे याचा वाढदिवस पनवेल परिसरातील आश्रमना धान्य व कडधान्य वाटप करून साजरा करण्यात आला. पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा मुलगा माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांचा नातू आराध्य म्हात्रे याच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील बालग्राम आश्रम, (खांदा कॉलनी), करूनेश्वर वृद्धाश्रम (भानघर), गिरीजा आश्रम (खारघर) येथे महिनाभर पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. येथील आश्रमांना तांदूळ, तेल, मीठ, साखर, डाळ, कड़ धान्य, पापड़ मसाले आदि जीवनावश्यक वस्तु 3 आश्रमात देण्यात आल्या.