रायगड जिल्ह्यातील टॅक्सी, रिक्षा चालकांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी. शिव सारथी वाहतूक टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेचि मागणी.
पनवेल /प्रतिनिधी : कोरोना महामारी पार्श्वभूमीवर
शासन मान्य टॅक्सी, रिक्षा वाहतूक पब्लिक सेवा लॉकडाऊनमुळे बंदच असून गेली अनेक दिवसांपासून शून्य आर्थिक उत्पन्नामुळे चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अतिरिक्त टँक्सी, रिक्षा परवाने खुले केले असून रायगड जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक सुशीक्षीत बेरोजगारांनी व परप्रांतीयांनी पसंती दिल्यामुळे वरील व्यवसाय या आगोदरच मेटाकुटीला आला असून त्याचा थेट परिणाम केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असलेल्या कुटुंबावर प्रत्यक्षपणे जाणवू लागाल असे असताना कोरोना प्रकोपाच्या काळात हातावर पोट असलेल्या व घरी बसलेल्या टॅक्सी रिक्षा चालकावर आर्थिक संकटामुळे हतबल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये टॅक्सी रिक्षासाठी घेतलेल्या थकीत कर्जाचे हफ्ते कसे भरावे घरभाडे कसे द्यावे या सद्यस्थितीत कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी कशी पेलावी तसेच मुलांच्या नवीन क्षैक्षणिक खर्चाचा भार कसा उचलावा अशा अनेक संकटात वाटचाल करीत असलेल्या कुटुंबाची परिस्थिती शासनासमोर मांडून रायगड जिल्ह्यातील टॅक्सी, रिक्षा चालकांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिव सारथी वाहतूक टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने पनवेल उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.