पनवेल / प्रतिनिधी : लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपून पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन गेला मात्र नाभिक समाजाचा उदरनिर्वाह करण्याचे साधनच म्हणजेच सलून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. नाभिक समाज एकमेव असा समाज आहेत जिथे बाळ जन्माला आल्यानंतर ते माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा नाभिक समाज आपले कर्तव्य बजावत असतो. आज तीन महिने होत आले. संपूर्ण महाराष्ट्राचा नाभिक समाज घरी बसून आहे. कोरोनाने नाभिक समाजावर बिकट अवस्था करून ठेवली आहे. आजच्या कोरोनाच्या संकटात श्रीमंत नाभिक घरात बसून खाईल.तसं बघायला गेलं तर आज पण काही नाभिक हे पत्र्याच्या शेडच्या दुकानात काम करत आहे तर काहींनी भाडेतत्वावर दुकान घेऊन आपला उदरनिर्वाह केला मात्र कोरोनामुळे आता भाडे देखील अंगावर पडले असून उपासमारीची वेळ सलून व्यवसाय करणाऱ्यांवर आली आहे याची जाणीव ठेवूनच पनवेलमधील श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यावतीने पनवेल मधील गरजू नाभिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष व राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, सहसचिव संतोष आमले, राजे प्रतिष्ठानचे खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, नावडा विभाग अध्यक्ष विकास गायकवाड, कैलास रक्ताटे, अमित पंडित, गणेश पंडित यांच्यासह पनवेल तालुका नाभिक समाजाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यावतीने पनवेलमधील नाभिकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.