पनवेल : - पोलीस म्हटले की,वर्दीचा रूबाब,तीतकाच दरारा,गुन्हेगारी दहशतीवर वचक त्यातच अधिकारी चाणाक्ष, हुषार असेल व जनतेत मिसळणारा असेल तर माञ कर्मचारी व कनिष्ठ अधिकारी यांची देखील झोकून काम करण्याची व आपल्या जनतेला भय,गुन्हेगारी चोरीमारी यातुन मुक्त करणारे एक चांगले नेटवर्क तयार करून सर्व सामान्य तसेच गोरगरीबांना न्याय देण्याचे सुशासन निर्माण करण्याची ताकद फक्त आणी फक्त पोलीस प्रशासनच्या माध्यमातुन जनतेला प्रदान करण्यात काही अधिकारी जनेच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी होतात ते अधिकारी जनतेच्या गळयातील ताईत कधी बनतात हे संबधीत अधिकारी यांना देखील प्रसंगी उमजत नाही असेच एक धाडसी व तीतकेच मिञत्व जपणारे पनवेल कार्यक्षेञात रूजु झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी नविमुंबई आयुक्तालयातील झोन 2 मधील समस्त सर्व सामान्य नागरीकांना वेळो वेळी दिलासा देण्याचे काम करीत आहेत त्यांच्या कार्यालयात आलेल्यांचे मनापासुन स्वागत केल्याने जनताजनार्धन साहेबांना आपले मानु लागले आहेत.
या ॠणानुबंधनाचा तसेच मैञीचा उपयोग सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना भरभरून झाला तो म्हणजे कोरोनो व्हायरस मुळे जगभर आपले पाय पसरले असताना राज्यातील पनवेल तालुक्यातील याचे प्रमाण नगण्य असुन देखील परराज्यातील अनेक कुटुंबाची पनवेल एस.टी.स्टॅन्ड,रेल्वे स्थानकात परीस्थीती बेताची नव्हती त्यांना आधारस्तंभासारखे प्रथम धाऊन येणारे वर्दीतील देवमाणुस म्हणुन रविंद्र गिड्डे हे ठरले रोज बहुतांश परीसर पिंजुन काढत ते एखाद्या मसीहा सारखे या लोकांना जेवण,पाणी अन्य सुविधा देण्याकरीता सातत्याने पुढाकार घेत होते.त्यांच्या कामाचा बोलबाला सोशल मिडीयातुन तसेच प्रींन्ट मिडीयातुन पनवेल तालुक्यातील तळागाळातील समाजात पोहचताच रविंद्र गीड्डे यांच्या कार्यालयात मदतनीसांची संख्या वाढु लागली एक आपल्या हक्काचा खाकी वर्दीतील देवदुत झोकुन गोरगरीबांची सेवा करीत आहे त्या सेवेला आपलाही हातभार लागावा या उदात्त हेतुने साहेबांना भेटुन आम्ही ही सढळ हाताने आपल्या चांगल्या कामात गोरगरीबांचे आशीर्वाद घेऊ इच्छित आहोत असे साहेबांचे फोनही खणखणु लागले.सहाय्यक पोलीस उपायुक्त रविंद्र गीड्डे यांनी सर्वाची मदत घेऊन आपला रोजचा गोरगरीबांच्या अन्नदानाचा व अन्य मदतरूपी कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवला यावरून एकच निष्कर्ष काढला जाऊ शकतो जनतेत मिसळणारा अधिकारीच कठीण प्रसंगात एका हाकेत मदतनीसांचे शेकडो हात आपल्या सोबत घेऊन एखाद्या मोठ्या प्रसंगाला जनतेच्या प्रेमामुळे सहजरीत्या सामोरा जाऊन गोरगरीबांचा मसीहा होऊ शकतो हे रविंद्र गिड्डे यांनी कोरोना सारख्या संकटात आपल्या चांगल्या कामामुळे जनतेला कृतीतुनच दाखविले आहे